Rangpanchami | रंगपंचमी

Rangpanchami | रंगपंचमी
माणसावर मनापासून प्रेम करणार्या एका साध्या माणसाचं हे लेखन असे वपुंनी आपल्या ह्या लेखनाबद्दल म्हटले आहे. त्यात विनय नाही तर ते खरोखरच खरे आहे. पण वपुंचे भाग्य असे की त्यांना नानाविध प्रकारची नाना माणसे भेटलीत ! त्यांच्याकडून हातचे न राखता जे मिळाले ते वपुंनी भरभरून घेतो. ती एक प्रकारची रंगपंचीमच होती; त्या रंगात नखशिखान्त भिनलेल्या वपुंनी तेच रंग त्यांच्या सार्या छटांसह आपल्या पुढ्यात आपल्या मिस्किलतेची झालर लावून जसेच्या तसेच ठेवले आहेत. आपणही हे रंग अनुभवलेले नाहीतच असे नाही पण आपल्याजवळ ती नजर नाही म्हणूनच वपुंच्या शैलीतून ते सारे वाचताना त्यात कृत्रिमता तर काही वाटतच नाही, काल्पनिकतेचा दोषही देता येत नाही उलट हे सारे आपलेच वाटते, आपल्याला भेटलेले वाटते न् ते सारे पुर्नप्रत्ययाचा आनंद देऊन जाते. मूळच्या 'खोचक' लेखनाला शि. द. फडणीस ह्यांच्या कुंचल्याची मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत मिळालेली 'बोचक' साथ अप्रतिम! "लेखणीतून कुंचल्यातून ह्या 'रंगपंचमी'तील काही रंग आपल्यावरही उडत असले तरी त्याबद्दल फिर्याद करावीशी वाटत नाही उलट दाद द्यावीशी वाटते."