Rani Abbkkadevi | राणी अब्बक्कदेवी

Rani Abbkkadevi | राणी अब्बक्कदेवी
कर्नाटकातील मंगलूर जवळ उळ्ळाला येथे राणी अब्बक्कदेवी राजधानी होती. त्याच्या राजवटीत त्यांनी पन्नास वर्षात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटी विरूध्द १९ लढाईत त्यांचा पराभव केला अशा शुरवीर राणीचा प्रेरक इतिहास. १५४४ ते १६२२ हा या राणीचा काळ होता. तिचं स्वत:चं आरमार होतं. तत्कालीन पोतुगीजांना खंडणी देण्यास या बाणेदार राणीने नकार दिला. यावरून राणी व तिचा पती यांच्यात मतभेद झाले. आपल्या प्रांताच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून या राणीने ऐन तरुण वयात आपल्या पतीशी घटस्फोटही घेतला. हा पती पुढे पोर्तुगिजांना जाऊन मिळाला. राणी अब्बक्कदेवी हिची कीर्ती युरोप, अरबस्तानातही पसरलेली होती. त्यामुळे तेथील काही विदेशी लोकही राणीला केवळ भेटायला कर्नाटकात येऊन गेले होते. त्यांनी तिचे नाव निर्भया असेही कौतुकाने ठेवले होते. राणी अब्बक्कदेवीने पोर्तुगिजांविरुद्ध सत्तेवर असतानाच्या पन्नास वर्षांत १९ लढे दिले. यात फक्त एका युद्धात तिला तह करावा लागला. बाकीच्या सर्व लढाया तिने जिंकल्या. तिच्या पराक्रमाची नोंद स्पेनच्या राजानेही घेतली होती. राणी अब्बक्कदेवीच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून भारत सरकारने नाविक दलातील युद्धनौकेला मागील वर्षी तिचेच नाव दिले आहे.