Ransangram | रणसंग्राम

Ransangram | रणसंग्राम
हा काळ १६५६ ते १६६६ या केवळ दहा वर्षांचा ! या दहा वर्षांच्या काळातच रक्तरंजित पायवाटांवरून जात औरंगजेबनं उत्तरेच्या सिंहासनावर बसत स्वतःला मुगल सम्राट म्हणून जाहीर केलं होतं. दक्षिणेकडील सर्व सल्तनत पादाक्रांत करत मुगलांच्या साम्राजाचा विस्तार हे एकच स्वप्न त्यांनं पाह्यलं होतं. त्याचा ह्या महात्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या प्रत्येकाची कोणतीही गय न करता निष्टुरपणं आपला संताप धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे ओकत तो पुढं चालला होता .दख्खनच्या पश्चिमेकडे असलेल्या भोसल्यांच्या जहागिरीचे वारसदार शिवाजीराजे मात्र स्वराज्याचं स्वप्न पाहात होते. त्यांच्या ध्येयाची परिपूर्ती करताना जे जे अडथळे आले त्यासाठी त्यांची तलवार म्यानातून सदैव उपसलेली होती. या अथक प्रयन्तात ते विजयी होत होते . आपल्या प्रदेशाच्या सीमा विस्तारत, आपल्या अतुलनीय धैर्याच्या , जबरदस्त डावपेचांच्या व बुद्धिचातुर्याच्या जोरावर समोर उभ्या ठाकलेल्या मृत्युच्या सापळ्यांतून सुटका करत त्यांनी एक मोठा दरारा निर्माण केला होता . आपणही आत्तापर्यंत कधीही न ऐकलेल्या ऐतिहासिक शौर्यगाथेचे साक्षीदार होत त्यातून उलगडत जाणारं सत्य जाणून घ्या . ही गाथा आहे ज्यांनी राजांबरोबर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं व प्रत्यक्षात आणलं त्या असंख्य धीरोदात्त स्त्रीपुरुषांची. हि गाथा आहे औरंगजेब कसा होता व जसा घडला तसा का घडला ह्याची. ही गाथा आहे शिवाजीमहाराजांच्या आग्र्याहून झालेल्या विस्मयकारी सुटकेची.