Rapan | रापण

Rapan | रापण
प्रल्हाद धोंड पुस्तकनिर्मिती बद्दल सांगतात .. 'या पुस्तकाची सुरुवात १९६६ मध्ये झाली. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट टीचर्स रूममधील गप्पांना पुस्तकाचे स्वरूप यावे असे माझ्या सहाध्यापकांना वाटले. माझ्या लिहिण्याच्या वेगापुढे माझ्या आठवणी जोराने धावत. म्हणून मी नाट्यपूर्ण आठवणी सांगायच्या आणि माझे सहाध्यापक संभाजी कदम यांनी लिहून घ्यायच्या अशी सुरुवात झाली. 'रापण' हे नाव कोकणातल्या गाबितांच्या रापणीवरून सुचले. लांबलचक प्रचंड जाळे समुद्रात दूरवर पसरून त्यात मासे अडकले की ते जाळे दोन टोकांनी वीस-तीस माणसे ओढून किनार्याला आणतात. सर्व माशांचे जेवढे जाळे ओढणारे तेवढे वाटे किनार्यावरच घालतात. पण एक जास्त वाटा असतो : तो देवाचा वाटा. त्यातील हवे ते व हवे तेवढे मासे कुणीही फुकट नेऊ शकतात. माझ्या आठवणींच्या रापणीतील या पुस्तकात आहे फक्त देवाचा वाटा : या वाट्यातले आपल्याला आवडेल ते घेऊन जा.'