Rasayatra | रसयात्रा

Rasayatra | रसयात्रा
कुसुमाग्रजांची निवडक कविता. गेली चाळीस वर्षे कुसुमाग्रज मोठ्या निष्ठेने काव्यनिर्मिती करीत आहेत. सत्य, शिव, सौंदर्य यांचे अधिष्ठान असणाऱ्या नंदनवनाची उपासना करणाऱ्या मराठी रोमँटिक संप्रदायाचे ते आजचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. केशवसुतांचा क्रांतिकारक आवेश, गोविंदाग्रजांची उत्कटता, बालकवींचे निसर्गप्रेम, आणि ज्यूलिअनांचा स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितेत नव्या जोमाने बहरले आहेत. सर्वांगीण सामाजिक क्रांती, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरविता वैयक्तिक सुखदुःखांची अतिशय हळुवार जोपासना करू पाहणाऱ्या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातिनिधिक कविता आहे. तिची सात्त्विकता आणि भव्यता कायमची टवटवीत आहेत. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचा हा एकमेव संग्रह.