Ratra Kshitijavarchi Ratra | रात्र क्षितिजावरची रात्र

Ratra Kshitijavarchi Ratra | रात्र क्षितिजावरची रात्र
विचार करणार्याला सत्य म्हणजे काय या प्रश्नाला केव्हातरी सामोरं जावं लागतं. व्याख्या काहीही असल्या तरी प्रत्येकापुरतं सत्याचं असं अस्तित्व असतंच. म्हणून प्रत्येकाचं सत्यही वेगवेगळं असतं. मात्र एकाच घटनेचे अर्थ वेगवेगळे असू शकतात हे सर्वांना माहीत नसतं, जाणवतही नसतं. संभ्रमाचं जाळं मग निर्माण होतं, नातेसंबंधाचा गुंताही. घर आणि सगळा समाज, सुखदु:खाचा सगळा परीघ, निम्म्यापेक्षा जास्त ज्योतिषशास्त्र, लग्न नावाच्या ज्या घटनेभोवती फिरतं त्या परिचित आणि नित्याच्या घटनेचा अर्थही अनेकदा, अनेकांना लागत नाही, जगाखाली किती जग असतात. जणू मुखवटे. जगण्याचा चेहरा शोधणं मग भयप्रद, परंतु आवश्यक होऊन जातं, या संदर्भातल्याच रात्र, क्षितिजावरची रात्र या संग्रहातल्या दीर्घकथा आहेत.