Ravan : Raja Rakshasancha | रावण : राजा राक्षसांचा

Ravan : Raja Rakshasancha | रावण : राजा राक्षसांचा
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेले. परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली. एवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा. रावणाच्या आयुष्यावर जिज्ञासेपोटी लिहिलेली संशोधनात्मक कादंबरी.