Ravindranath Tagoranchi Patre | रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे

Ravindranath Tagoranchi Patre | रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे
रवीन्द्रनाथ यांच्यासारखं कविमन, चौकस निरीक्षणक्षमता, लेखनाची चित्रमय शैली, आता बांगला देशात असलेल्या प्रदेशात पद्मा नदीकाठी वसलेल्या निसर्गरम्य गावाची पार्श्वभूमी आणि पत्रलेखनासारखं प्रवाही माध्यम…..वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र – संवाद साधला होता….पुढील काळात रवीन्द्रनाथांनी लिहिलेल्या कथा-कवितांत या पत्र-संवादाचे अनेक कवडसे दिसून येतात. उदाहरण द्यायचं तर ‘तीन कन्या’ या सत्यजित राय दिग्दर्शित चित्रपटत्रयीची कथा….बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या विलास गिते यांनी थेट बंगाली भाषेतून मराठीत अनुवादित केलेली अभिजात साहित्यकृती….