Reminiscences Of A Stock Operator | रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर

Reminiscences Of A Stock Operator | रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर
गेल्या शतकातील अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध शेअर ट्रेडर आणि गुंतवणूकदार तसेच शेअर विश्वातील सुरक्षा विश्लेषक, जेसी लिव्हरमोर यांच्या आर्थिक जीवनाचा अत्यंत मनोरंजक आणि नाट्यमय अनुभव, स्मृती रुपात स्टॉक ऑपरेटरच्या आठवणी या व्यावसायिक अभिजात ग्रंथात आपल्याला आढळतील. एकूणच, लिव्हिरमोरच्या वॉल स्ट्रीटवरील संपूर्ण आर्थिक प्रवासाचा आढावा प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला आढळेल. लिव्हरमोर यांना शेअर बाजारात अफाट कीर्ती लाभली! त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये अनेक वेळा लाखो डॉलर्सची कमाई केली आणि गमावली देखील! एके क्षणी त्यांच्या वाट्याला दिवाळखोरीही आली. एके ठिकाणी ते म्हणतात ‘कोणत्याही शेअर ट्रेडरचे ध्येय नियमितपणे नफा मिळवणे, हेच असते. सातत्यपूर्ण विजेते असलेले शेअर ट्रेडर इतर सर्वांपेक्षा निश्चितच वेगळा विचार करतात. जे ट्रेडर्स इतरांच्या सल्यापेक्षा स्वत:च्या कृतींवर विश्वास ठेवून न डगमगता जे करायला हवे, ते करण्यावर भर देतात, तेच नेहमी यशस्वी होतात. शेअर मार्केटमधील शेअर्सच्या किंमती किती वेळात आणि कशा बदलतील, या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तुमचा अंदाज कधी खरा ठरेल आणि कधी तो फसेल, हे ही कोणी सांगू शकणार नाही. या सर्वांच्या पलीकडे तुम्हाला व्यावहारिक ज्ञान घेऊन पुढे चालत राहायचे आहे. जेणेकरून बाजारपेठेमध्ये अमर्याद वाव असलेल्या वातावरणात, तुम्ही स्वत:चं नुकसान करुन घेणार नाही. ट्रेडिंग ह्या विचारधारेचा अनुभव घेणे, हे तुमच्या दृष्टिकोनाचे, तुमच्या समजुतींचे, तुमच्या मनोवृत्तीचे तसेच तुमच्या मानसिकतेचे फलित आहे.