Reshepalikadil Laxman | रेषेपलीकडील लक्ष्मण

Reshepalikadil Laxman | रेषेपलीकडील लक्ष्मण
उपराकार लक्ष्मण माने यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त संपादन केलेला हा गौरवग्रंथ. यात माने यांना अगदी तरुणपणापासून ते आजतागायत ज्या ज्या सहकाऱ्यांनी चळवळीत साथ दिली, त्या लोकांनी लिहिलेले लेख आहेत. यातील लेखांवर सहज नजर फिरवली तरी लक्ष्मण माने यांचा स्नेहीमंडळींचा गोतावळा कसा विस्तृत होता, हे लक्षात येते. तसेच सामाजिक किटाळ सहन करूनही त्यांची लेखणी थांबली नाही, हेही दृष्टीस पडते. डॉ. बाबा आढाव, खा. डॉ. जनार्दन वाघमारे, अरुण खोरे, प्रा. रामनाथ चव्हाण, नारायण जावलीकर, डॉ. एकनाथ आव्हाड, डॉ. जयसिंगराव पवार या मान्यवर सहकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी शशी माने यांचा लेखही यात आहे. भटक्या विमुक्त लोकांना एकत्रित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या चळवळी, मोर्चे, संघर्ष त्यातला सच्चेपणा याला उजाळा देणाऱ्या आठवणी यांत पाहायला मिळतात. तसेच प्रत्येकाच्या जीवनजाणिवा समृद्ध करून मानवता निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, हे दिसून येते.