Reshimregha | रेशीमरेघा

Shanta Shelke | शांता शेळके
Regular price Rs. 86.00
Sale price Rs. 86.00 Regular price Rs. 95.00
Unit price
Reshimregha ( रेशीमरेघा ) by Shanta Shelke ( शांता शेळके )

Reshimregha | रेशीमरेघा

About The Book
Book Details
Book Reviews

कवयित्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या शांताबाईंनी विपुल गीतलेखनही केले आहे. चित्रपट, नाटके याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा माध्यमांतून त्यांची अनेक गीते लोकांपर्यंत पोहोचली आणि ती लोकप्रियही झाली. शान्ताबाई या आजच्या एक आघाडीच्या गीतकार आहेत. गीतांसाठी विविध रचनाबंध त्यांनी हाताळले आहेत, त्याचप्रमाणे आशयाचीही त्यात विस्मयकारक विविधता आहे. लावण्या आणि गौळणी या पूर्वापार चालत आलेल्या गीतप्रकारांत शांताबाईंनी अनेक गीते लिहिली, इतकेच नव्हे तर त्या प्रकारांना त्यांनी स्वत:चे असे एक परिमाणही दिले. ‘रेशीमरेघा’ या संकलनात शांताबाईंनी लिहिलेल्या अनेक लावण्या, गौळणी आहेत, तसेच त्यांत काही वेधक द्वंद्वगीतेही आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या प्रसन्न ‘रेशीमरेघा’.

ISBN: 978-8-17-766227-6
Author Name: Shanta Shelke | शांता शेळके
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 80
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products