Rojgar Nirmitichi Disha | रोजगार निर्मितीच्या दिशा

Rojgar Nirmitichi Disha | रोजगार निर्मितीच्या दिशा
दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी रोजगार कमी होत गेल्यास आर्थिक विषमता ही आज देशापुढची एक गंभीर समस्या …. वाढीला लागणार आणि आर्थिक विषमता वाढली की सामाजिक प्रश्नही निर्माण होणार , यावर उपाययोजना करून रोजगारनिर्मिती वाढीस कशी लागेल याचा ऊहापोह या पुस्तकात आनंद करंदीकर अभ्यासपूर्णरित्या करतात. "बेरोजगारीची आर्थिक सामाजिक – राजकीय कारणं बेरोजगारीचे दुष्परिणाम याचं सरधोपट विश्लेषण न करता अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा आधार घेत करंदीकर विषयाची मांडणी करतात . सोप्या भाषेत कधी कवितांचा आधार घेत ते वस्तुस्थितीचं आकलन करतात . शिक्षण आरोग्य शेती बांधकाम हरित उद्योग हस्तव्यवसाय छोटे उद्योग अशा विविध क्षेत्रांत तब्बल ३ कोटी ६० लाख रोजगारनिर्मिती होण्यास देशात वाव आहे हे ते साधार पटवून देतात . संख्याशास्त्रीय पध्दतीने आखणी केल्यास रोजगारनिर्मितीचं उद्दीष्ट आपण गाठू शकतो याचा ते विश्वास देतात . विविध तक्ते आलेख यांच्या साहाय्याने ते विषयाची उकल सोप्या रितीने करतात." "हे पुस्तक एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी ठरणार आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत समस्येची गंभीरपणे दखल घेत त्यावर शास्त्रीय पध्दतीने उपाययोजना सांगणारं पुस्तक …"