Runanubandh | ऋणानुबंध

Runanubandh | ऋणानुबंध
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले. हा प्रवास कधी 'एकला चलो रे' च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला. प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा - निराशेचे क्षणही. सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय म्हणून मनाच्या गाभाऱ्यात जागा करून राहतात ...अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही...