Sadara Badalaleli Manas | सदरा बदललेली माणसं
Sadara Badalaleli Manas | सदरा बदललेली माणसं
जगण्याच्या उलथापालथीत भोवंडून गेलेल्या माणसांची स्पंदनं...अंगातला सदरा बदलावा तसा आपला भोवताल बदलत आहे. सभोवतालची स्कायलाइन झपाट्याने बदलत चाललीय. नवी भाषा, नवी तंत्र, नवे व्यवहार असा नवलाईचा पसारा सगळीकडे पसरत चाललाय. हे सार विलक्षण वेगानं घडतंय. कालचे दिवस फार सुखाचे नव्हते. तेव्हाही माणसाच्या जगण्याचा झगडा तीव्र होताच, पण नव्या पानफुटीची आसहि होती. आज बदलांच्या या झंझावातात नव्या पानफुटीची प्रतीक्षा संपून गेली आहे का? बदल खरंच घडला कि बदलाचा केवळ देखावा झाला? आजच्या जगण्याच्या उलथापालथीत भोवंडून गेलेल्या माणसाची ललित अंगाने टिपलेली स्पंदन...