Sahaj | सहज

Dhanajay Joshi | धनंजय जोशी
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Sahaj ( सहज ) by Dhanajay Joshi ( धनंजय जोशी )

Sahaj | सहज

About The Book
Book Details
Book Reviews

आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे 'सहज'. रोजच्या जगण्यातल्या नेहमीच्या अनुभवांना झेन कथा, झेन गुरूंच्या आठवणी किंवा प्रसंग यांची जोड देऊन जोशी लीलया झेन तत्त्वज्ञानातली मूलतत्त्वं आपल्याला त्यांच्या या लहानशा लेखांमधून सांगून जातात. विशेष म्हणजे ती सांगत असताना त्यांचा सूर उपदेशकाचा नसतो. तो सहज, पण काहीतरी महत्त्वाचं सांगून जाणारा असतो. एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक... 'सहज'...

ISBN: 978-9-38-945827-5
Author Name: Dhanajay Joshi | धनंजय जोशी
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 147
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products