Sahakardhurin | सहकारधुरीण

Sahakardhurin | सहकारधुरीण
भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं...अशा कर्तृत्ववान विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ 'सहकारधुरीण' महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.