Sahityavichar Ani Saundaryashastra | साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र

Sahityavichar Ani Saundaryashastra | साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
डॉ. रा. भा. पाटणकर हे नाव सौंदर्यमीमांसक, समीक्षक व सांस्कृतिक भाष्यकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहे.साहित्याविषयी, साहित्यसमीक्षेविषयी, संस्कृत व पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्राविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लेखांत केली आहे.आपल्या अभ्यासविषयामध्ये त्यांना ठोस काहीतरी सांगायचे असते. त्यामुळे त्यांचे लेखन त्या अभ्यासविषयामध्ये वाचकाला अनेक मर्मदृष्टी देणारे, त्याच्या विचाराला गती देणारे असते. डॉ. पाटणकरांनी कला व साहित्य यांविषयी जे व्यापक सिद्धान्तन केले आहे, त्याला पूरक ठरणारे, त्यामध्ये भर टाकणारे विवेचन या पुस्तकात आले आहे.