Sakalrajkaryadhurandhar Sadashivravbhau | सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ

Kaustubh Kasture | कौस्तुभ कस्तुरे
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Sakalrajkaryadhurandhar Sadashivravbhau ( सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ ) by Kaustubh Kasture ( कौस्तुभ कस्तुरे )

Sakalrajkaryadhurandhar Sadashivravbhau | सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ

About The Book
Book Details
Book Reviews

वयाच्या सोळाव्या वर्षांपासून भाऊसाहेबांनी रणांगणात तलवार चालवायला सुरुवात केली ती त्यांच्या मृत्यूपर्यंत खाली ठेवली गेली नाही. नानासाहेबांचा तर भाऊंवर प्रचंड जीव. रघुनाथ, जनार्दन असे सख्खे भाऊ असतानाही नानासाहेब भाऊसाहेबांशिवाय कारभार करणे अशक्य असं म्हणत असत. कर्नाटक आणि आसपासच्या प्रदेशात भाऊसाहेबांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी नानासाहेबांसह एकूण सहा मोहीम केल्या. या सहा मोहिमांमध्ये अनेक युद्धे झाली, आणि प्रत्येक वेळेस भाऊसाहेबांना जय मिळाला. हा संपूर्ण प्रदेश मराठी राज्याला जोडण्याचं श्रेय खरंतर भाऊसाहेबांना जातं. मेहेंदळे, पटवर्धन, घोरपडे इत्यादी सरदारांकडून वेळच्यावेळी कामगिऱ्या बजावून घेण्यात भाऊसाहेबांनी कसलीही कमतरता ठेवली नाही. "भाऊसाहेब आणि त्यांच्या समकाळात वावरत असलेल्या रामचंद्रबाबा शेणवी जनकोजी शिंदे गोविंदपंत बुंदेले कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे तसेच सातारकर छत्रपती रामराजे वगैरे अनेक खाशा व्यक्तिंची हस्ताक्षरे आपल्याला तत्कालीन पत्रव्यवहारात आढळून येतात. स्वतः भाऊसाहेबांची माहिती मिळवण्यासाठी त्यांची कैफियत आणि बखर पानिपतची बखर मराठेशाहीची हकिकत अशी अनेक दुय्यम साधनेही उपयोगास येतात. या अशा निवडक खाशा व्यक्तींच्या हस्ताक्षराची पत्रे आणि बखरींची छायाचित्रे सदर पुस्तकात अंतर्भुत करण्यात आली आहेत. भाऊसाहेबांच्या पारदर्शक काराभाराचे एक उदाहरण म्हणून पानिपतच्या मोहिमेवर असताना कोणाकडून किती येणे बाकी आहे यासंबंधी पुण्याला नानासाहेबांना पाठवलेला ताळेबंद पहिल्या परिशिष्टात दिला आहे. या विस्तृत ताळेबंदावरुन किती काटेकोरपणे कामकाज चालत असे याची कल्पना येईल. इ.स. १७५० पासून इ.स. १७६१ पर्यंत नानासाहेब भाऊसाहेब आणि विश्वासराव यांच्या हालचालींचा तक्ता दुसर्‍या परिशिष्टात दिला आहे. पेशव्यांचे दिवाण अथवा कारभारी झाल्यानंतर सदाशिवरावभाऊंच्या थोडक्यात हालचाली आपल्याला या तक्त्यातून समजतील. अस्सल समकालीन साधनांच्या आधारे भाऊसाहेबांचं हे चरित्र निश्चितच उपयोगी पडेल अशी खात्री आहे."

ISBN: 978-8-19-324814-0
Author Name: Kaustubh Kasture | कौस्तुभ कस्तुरे
Publisher: Rafter Publications | राफ्टर पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 192
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products