Sakhya | सख्य

Sakhya | सख्य
हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक शरद वैद्य, स्वत:ला मवाली म्हणवणारे पण मवाळ व प्रेमळ षांताराम पवार, सिनेजगताचा चालताबोलता इतिहास द. भा. सामंत, साऊंड रेकॉर्डिगसाठी फिल्मफेअर मिळवणारे मनोहरदादा, नेपथ्यकार दामू केंकरे या चंदेरी जगतातील माणसांसोबत व्यंकू, अय्या गोडबोले, राकेश शर्मा अशा सामान्य पण भन्नाट माणसांचाही समावेश आहे. अर्थात ही व्यक्तिचित्रे त्या त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे आरसे नाहीत, तर ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही कवडसेच सांगतात. पण ते या खुबीने की त्यावरून तो माणूस समजून घ्यायला मदत होते. आपापल्या मनाप्रमाणे, जिद्दीप्रमाणे जगणारी ही माणसं लोभस आहेत-काही तडकभडक वाटत असली तरीही- लोभावणारी आहेत.