Saki : Bar And Restaurant | साकी : बार अँड रेस्टॉरण्ट

Saki : Bar And Restaurant | साकी : बार अँड रेस्टॉरण्ट
मराठी लेखक शब्दांमध्ये, भाषेमध्ये अडकतात लेखक पंकज कुरुलकरांचे लेखन त्याला अपवाद. ते तुम्हाला विलक्षण अस्वस्थ करते, त्रास देते. त्यांचा आशय अंगावर येतो आणि श्वास गुदमरून टाकतो. पहिल्या वाक्यापासून त्यांची कथा घेरून टाकते. कुठल्याही स्तरातील माणसाबद्दल ते सहजपणे लिहितात ह्याचे कारण मुंबई त्यांनी फार जवळून बघितली आहे. आयुष्यभरात एखादी गल्ली समजली तरी पुरे असे त्यांना स्वत:ला वाटते. त्यांचे लेखन बघता त्यांना मुंबई शहराची दाहक जाणीव आहे ह्याची खात्री पटते. ते कुठल्याही ‘ईझम’चा झेंडा बाळगत नाहीत, माणसाकडे अगदी स्वच्छपणे बघतात. ते वाचकाचे प्रबोधन करत नाहीत, मास्तरकी करत नाहीत. त्यांच्या लेखनात विलक्षण मोकळेपणा आहे.आयुष्याबद्दलची वैश्र्विक जाणीव समृद्ध करणार्या ह्या सात दीर्घकथा !