Sala Mai To Sahab Ban Gaya | साला मैं तो साहाब बन गया

Sala Mai To Sahab Ban Gaya | साला मैं तो साहाब बन गया
'साला, मैं तो साहाब बन गया!' हे माझे आत्मचरित्र आहे. यात माझ्या बालपणापासून ते पोलीस सब इन्स्पेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास शक्य तेवढ्या प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात मला कसे विविध कार्यात अपयश मिळत गेले, मी त्यातून कसा सावरत गेलो हे दर्शविले आहे. जीवन जगण्यासाठी कश्या खडतर मार्गाने वाटचाल करावी लागली याबाबत उहापोह केला आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मी जसा अनुभवला तसा पुस्तकात सोप्या भाषेत उतरविला आहे. एक निमशहरी भागात राहणारा निम्न मध्यवर्गीय घरात वाढलेला मुलगा लढत, ठेचाळत, अडखळत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कसा अवघड स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी निवडला जातो हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे.