Samajmanatil Bimb | समाजमनातील बिंब

Samajmanatil Bimb | समाजमनातील बिंब
प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे अनुभव हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. व्यवस्थेबाबत बाहेरुनच निरीक्षण करणाऱ्या आणि व्यवस्थेची समीक्षा करणार्या सामान्यांना असे अनुभव वेगळी दृष्टी देऊन जातात. तालुका, राज्य, केंद्र अशा विविध पातळ्यांवरील कारभारातील गुंतागुंत समजण्यासाठी असे लिखाण मोलाचे असते. १९७४ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या लीना मेहेंदळे यांचा अनुभव तर दांडगा आहेच, पण त्यांचे सूक्ष्म निरिक्षण, विश्लेषणातील ताकद आणि आवश्यक त्या दूरदृष्टीसह एखाद्या प्रश्नावरील उपाय सुचल्याची क्षमता लक्षात येतात. विविध दैनिकांतून, मासिकातून व दिवाळी अंकातून या संग्रहातील लेख पूर्वी प्रकाशित झाले आहेत. प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनातील, कायद्यातील त्रुटी याचा ऊहापोह करणारे लेख या संग्रहात आपल्याला वाचता येतात.