Samajswasthya |समाजस्वास्थ्य

Samajswasthya |समाजस्वास्थ्य
'रधों'चे द्रष्टेपण उलगडणारे नाटक. महाराष्ट्राला कायम पुरोगामित्वाची उपाधी बहाल केली जाते. परंतु अशा महाराष्ट्रातही र. धो.कर्वेंसारखा सुधारक एकटा पडला होता. माजसुधारणेच्या ध्यासापायी त्यांना आयुष्यात अनेक खटल्यांना तोंड द्यावे लागले. या खटल्यांमधून कर्व्यांचे कार्य आणि त्यांचे काळाच्या संदर्भात महत्त्व अधोरेखित करणारे नाटक प्रा. अजित दळवी यांनी लिहिले होते. त्या गाजलेल्या नाटकाची संहिता आता पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली आहे. ती वाचक, अभ्यासकांसाठी आणि प्रयोग करू इच्छिणारांसाठीही उपयुक्त आहे. पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा लेखही असून कर्वेंचे द्रष्टेपण त्यांनी उलगडून दाखवले आहे,