Samaksha | सामक्षा

Samaksha | सामक्षा
‘स्वतःच्या जगण्यावर स्वतःचा हक्क असायला हवा’. पण वास्तवात ते कितीसं शक्य असतं? एखाद्याच्या जगण्यातलं यशापयश, इच्छांची पूर्ती-अपूर्ती हे केवळ त्याच्या वैयत्तिक गुणावगुणांवर, कौशल्यांवर अवलंबून असतंच असं नाही. माणसाच्या प्रत्येक क्षणाला इतरांच्या अस्तित्वाचे संदर्भ असतात. कुटुंब आणि समाजातील माणसे असे संदर्भ पुरवीत असतात. काही जणांसाठी ते शिड्यांप्रमाणे लाभदायी ठरतात तर काही जणांसाठी त्या बेड्या ठरतात. ज्यांच्यासाठी ते ‘बेड्या’ ठरले आहेत; अशा मनस्वी माणसांच्या विलक्षण कहाण्यांचा ‘सामक्षा’ हा कथासंग्रह सुमेध वडावालांच्या अनोख्या शब्दकळेतून सिद्ध झाला आहे. म्हणलं तर आपल्या आजूबाजूच्या विश्वात घडणाऱ्या कथा आहेत. म्हटलं तर त्या आपल्या गावीही नाहीत. वर्णनातून कथेतील जग डोळ्यासमोर उभं करून वाचकाला त्या जगाचा भाग करून घेणाऱ्या अशा या कथा आहेत. आशयघन आणि आशासंपन्न अशा या कथा वाचकाला अधून मधून पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतील, हे नक्की.