Samidha | समिधा

Samidha | समिधा
साधनाताई आमटे यांच्या जीवनातील काही संस्मरणे. थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या गृहिणी, सखी, सचिव बनून आयुष्यभर सावलीसारख्या राहिलेल्या साधना आमटे यांचे हे चरित्र आहे. बाबा आमटे. यांच्यासारख्या आगळ्या व्यक्तीमत्वाचा जगावेगळा संसार करणं ही सोपी गोष्ट नाही. साधनाताईंनी हे आव्हान पेलले. त्यात त्यांचे व्यक्तिमत्वही घडले. आमटे यांची कडवी तत्वनिष्ठा, संकटे अंगावर घेण्याची हौस, कुष्ठरोग्यांसंबंधीचे त्यांचे कार्य आदींशी जुळवून घेऊन साधनाताईंनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या दांपत्यजीवनाबरोबरच साधनाताईंच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची ओळखही पुस्तकातुन होते.