Sampurna Kamjeevan | संपूर्ण कामजीवन

Sampurna Kamjeevan | संपूर्ण कामजीवन
कामजीवन जगायचे असते, पण त्याविषयी बोलायचे नसते. विवाह पवित्र मानला जातो, मातृत्व पूज्य मानले जाते, पण यातील दुवा, म्हणजे कामजीवन हे निषिद्ध मानले जाते.संपूर्ण कामजीवनाच्या विविध पैलूंची शास्त्रीय माहिती हवी. यौवनात पदार्पण ते पौगंडावस्था, युवावस्था, वैवाहिक जीवन, चाळिशीनंतरचे कामजीवन व इतर अंगांविषयी वैज्ञानिक माहितीची गरज भासते. आपल्या मनात अनेक शंका असतात; कधी कामसमस्या उद्भवतात; कधी समाजात लैंगिक गुन्हे घडतात; तर कधी लैंगिकता-शिक्षण मुलामुलींना द्यायला हवे होते असे वाटते. अशा या सर्व विषयांवर अधिकारवाणीने लिहिणाऱ्या तज्ज्ञ लेखकाचा 'संपूर्ण कामजीवन' हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा.कामजीवनाविषयीच्या अनेक शंकांचे निरसन करणारा ग्रंथ.