Sampurna Panchatantra | संपूर्ण पंचतंत्र

Sampurna Panchatantra | संपूर्ण पंचतंत्र
प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वार्धिक लोकप्रिय संग्रह मनाला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभाल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्राविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. पंचतंत्राच्या प्रारंभीच कथामुखामध्ये त्याचे रचनाप्रयोजन स्पष्ट केले आहे. या कथांमध्ये मानवेतर प्राणी रूपकस्वरुपात समोर येतात. लबाड कोल्हा, ढोंगी मांजर, हंसी कावळा, घुबड ही सारी मानवाचीच रूपके आहेत. प्राण्यांप्रमाणेच मंत्री आहेत, चांगले मित्र आहेत, चोर आहे नि राजपुत्र- राजकन्याही आहे. या नीतिकथा आहेत. त्यामुळे या नीट वाचल्या, तर आजच्या व्यवहारातही त्या उपयोगी पडतील.