Samrat Shreeharsh | सम्राट श्रीहर्ष

Samrat Shreeharsh | सम्राट श्रीहर्ष
साधारणपणे पश्चिम पंजाब (उत्तर प्रदेश), बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिसा ह्या प्रांतांवर श्रीहर्ष किंवा राजा हर्षवर्धन ह्याने आपली सत्ता गाजवली आणि काठेवाड व आसाम येथील राजांनी त्याचे स्वामित्व मान्य केले होते. त्याने स्वतःचा 'संवत' सुरु केला होता आणि तो, ई. सन ६०६ पासून पुढची ३०० वर्ष सुरू होता. हा सम्राट हर्षवर्धन नुसता बलाढ्य राजा नव्हता, तर तो अक्षरसहित्य व वांग्मयकलेचा पुरस्कर्ता असून त्याच्या पदरी बाणभट्ट आणि कवी मयूर यांचा अंतर्भाव होता. याखेरीज तो स्वतःही उच्चप्रतीचा कवी, लेखक आणि नाटककारही होता. हा राजा हिंदू व बौद्ध अश्या दोन्ही धर्माचे पालन करीत असे. दुर्दैवाने त्याला पुत्रसंतान नव्हते, त्यामुळे त्याचे सर्व साम्राज्य त्याच्यानंतर लयाला गेले.याच हर्षवर्धन राजाचे हे पुस्तक श्री. केशव रामचंद्र जोशी यांनी सविस्तर सरलसुंदर लिहिले असून इतिहासाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना व संशोधकांना ते उपयोगी पडेल अशी आशा वाटते.