Samudramanthan | समुद्रमंथन

Samudramanthan | समुद्रमंथन
वृत्तपत्रं असोत की नियतकालिके, ती समकालाच्या पाऊलखुणा असतात. ही काळाची पावले उठतात ती पत्रकार, संपादक, स्तंभलेखक क्षण-क्षण टिपत तो सजीव करत त्यांना मृत्युंजयी बनवतात. म्हणून वि. स. खांडेकरांनी सावंतवाडी सारख्या आडगावी, तेही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काळ बंदिस्त करत विपुल लेखन वैनतेय साप्ताहिकात केलं. समुद्रमंथन, रानफुले, टिपणे, अशा त्या त्रिदलीय स्तंभलेखनाचं ग्रंथरूप म्हणून 'समुद्रमंथन' कडे पहावं लागेल. हे लेखन म्हणजे तत्कालावरील खांडेकरीभाष्य होय. ते आज वाचताना लक्षात येतं की खांडेकर केवळ वर्तमानाचे चित्रकार नव्हते तर उद्याचे ते भाष्यकारही होते. 'गागर में सागर' शैलीचं मूर्त ग्रंथरूप म्हणजे 'समुद्रमंथन.' ह्यात मिथकात सामावलेलं निर्णयन अनुभवत वाचक केंव्हा प्रगल्भ नि समृद्ध होऊन जातो, ते लक्षातच येत नाही.