Sangatye Aika | सांगत्ये ऐका

Sangatye Aika | सांगत्ये ऐका
श्रीमती हंसा वाडकर यांचे आत्मचरित्र हे त्रोटक आहे. अपुरे आहे. त्यात बर्याचशा जागा कोर्या सुटलेल्या आहेत. परंतु म्हणूनच की काय कोणास ठाऊक ते मनाला विलक्षण चटका लावून जाते. हंसाबाईंनी खूप अनुभवले आहे. खूप सोसले आहे. त्यांना माणसांचा आलेला अनुभव हा चांगल्यापेक्षा वाईटच अधिक आहे. परंतु त्यांच्या वाणीत व लेखणीत विखार नाही. तिच्यातून त्यांच्या मनाच्या वेदना अनेकदा ठिबकत असल्या तरी कोठेही वृत्तीचा कडवटपणा अवतरत असल्याची शंकाही येत नाही ही किमया अपूर्व आहे. सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा... ह्या समंजसपणाला सर्वत्र दु: खाची किनार आहे... सांगत्ये ऐका या आत्मकथनाची पातळी एकसारखी उंचावीत आहे...