Sangeet Sanidhya | संगीत सानिध्य

Sarangee Ambekar | सारंगी आंबेकर
Regular price Rs. 216.00
Sale price Rs. 216.00 Regular price Rs. 240.00
Unit price
Sangeet Sanidhya ( संगीत सानिध्य ) by Sarangee Ambekar ( सारंगी आंबेकर )

Sangeet Sanidhya | संगीत सानिध्य

About The Book
Book Details
Book Reviews

फक्त संगीताच्या सान्निध्यात नव्हे तर संगीतप्रेमात चिंब न्हाऊन टाकणारा अनुभव देणारे हे लेखन ! "आपण संगीत ऐकतो ऐकता ऐकता तल्लीन होतो आणि गुणगुणतोही; तरी संगीताचे इतके विविध पैलू आपल्याला जाणवत नाहीत संगीतकारांविषयी वाचायला आपल्याला आवडतं. त्या रसिल्या आठवणी स्फूर्तिदायक चरित्रे मनोवेधक पत्रे हे सगळे वाचकाला मंत्रमुग्ध करतात. संगीत आणि साहित्य ह्या दोहोंनीही लेखिका झपाटल्याचा प्रत्यय या पुस्तकातील प्रत्येक लेखातून येतो. या पुस्तकातून आपल्याला व्यक्ती पुस्तके यांची भेट होतेच. शिवाय संगीत ही प्रयोगकला असल्याने व्यासपीठाच्या बदलत्या रूपाचा आढावा यातून घेतला आहे. मंदिर दरबारापासून मैफल उत्सवी मंडप ते थेट आकाशवाणी दूरचित्रवाणी नाटक सिनेमा या मायाजालापर्यंतचा विस्मयकारक प्रवास या पुस्तकात आढळतो." "पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. अश्विनी भिडे -देशपांडे म्हणतात सारंगीचं लेखन तिच्यावर झालेल्या चांगल्या संस्कारांचं प्रतिबिंब आहे. एखाद्या सुंदर नैसर्गिकरीत्या फुललेल्या फुलाचा एका निष्णात फोटोग्राफरने काढलेला फोटो जसा त्या फुलाचं सौदर्य द्विगुणित करतो तसं मला हे सारंगीचं लेखन वाटलं. सारंगीचा दृष्टिकोन आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जातो."

ISBN: 978-8-19-551277-5
Author Name: Sarangee Ambekar | सारंगी आंबेकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 123
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products