Sankshipt Mahabharat | संक्षिप्त महाभारत

Sankshipt Mahabharat | संक्षिप्त महाभारत
महान विदूषी दुर्गाबाई भागवत तर म्हणतात, ‘महाभारतासारखी महान प्रगल्भ तसेच श्रेष्ठ कलाकृती आपल्या जनसामान्यांच्या समाज-संस्कृतीचा अत्यंत अविभाज्य व अभिमानास्पद भाग झाली आहे. त्यातील वासुदेवाची भगवद्गीता तर आपल्या जीवनाची मार्गदर्शिका झालेली आहे. व्यासांसारखा प्रगल्भ प्रतिभेचा ग्रंथकार शतकाशतकांतून वाहत आणि विकसित होत चाललेल्या वैचारिक, तात्विक व भावनिक सूत्रबंधांशी स्वतःला असा निःसंदिग्ध गोवून टाकतो. त्यावेळी कळतनकळत साहित्यपणाचे-काव्याचे त्रिकालतीर्थच सहजपणे आकाराला येते. मानवी जीवनाचे महावस्त्र हे, अटळ यातना दुःख, सचेतनत्व आणि परस्परमैत्र या तिहेरी धाग्यांनी अतूट पण अत्यंत व्यामिश्रतेने गुंफले गेलेले आहे. वनवास-अज्ञातवास तसेच जीवनातील अनंतमयी दुःखाचे, सूडाचे, शापवचनांचे तसेच स्वरूप आणि विश्वरूप यांच्या प्राणबंधाचे सौभाग्य-तत्त्वदर्शन महाभारतासारख्या महान कलाकृतीत ठायी ठायी आढळते.