Sankshipta Marathi Vangamaykosh Part 1 | संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड १

Sankshipta Marathi Vangamaykosh Part 1 | संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड १
आरंभापासून आजतागायतच्या मराठी वाङ्मयाची ओळख सर्वसामान्य मराठी वाचकांना व्हावी या हेतूने या कोशाची योजना आखली आहे. १. आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड २. १९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड १ (आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड) "१९२० पर्यंतच्या कालखंडातील वाङ्मयाचा व्याप फार मोठा आहे. वाङ्मयाचे अनेक आविष्कार दिसतात. हा कोश वाङ्मयाची बहुविध वळणे दिसतात. या सर्वसमावेशक वाङ्मयविश्वाचे विविधांगी स्वरूप थोडक्यात वाचकांपुढे उलगडून ठेवतो. यात बहुविध साहित्यप्रकार पंथ संप्रदाय नियतकालिके साहित्य व नाट्य संमेलने साहित्य संस्था व प्रसारक या सर्वांची दखल घेतली आहे." "या कोशात ग्रंथकारांसंबंधी माहिती तर आहेच. शिवाय त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती साहित्यविश्वात अढळ स्थान मिळालेल्या कादंबऱ्या नाटके कविता कथा यांसंबंधीही नोंदी आहेत. लेखन मुद्रण प्रकाशन व बितरण या वाङ्मयव्यवहाराच्या चार पाय-यांशी निगडित अशा व्यक्ती व संस्था यांच्याही नोंदी केल्या आहेत." "हा इतिहास दृश्य स्वरूपात सादर करण्याच्या उद्देशाने ३५० हून अधिक चित्रे - छायाचित्रे रेखाटने आकृती हस्तलिखितांची पृष्ठे ग्रंथांची नियतकालिकांची शीर्षकपृष्ठे इत्यादी - या कोशात समाविष्ट केली आहेत. त्यांपैकी काही चित्रे दुर्मीळ आहेत." "सुरुवातीच्या काळातील साहित्याचा शोध व त्याबद्दल उपलब्ध सर्व माहिती या कोशात सापडेल. परिशिष्टात समाविष्ट निवडक संदर्भग्रंथांची सूची व ग्रंथकारांची कालानुक्रमानुसार निर्देशसूची याही अभ्यासकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. संशोधन लेखन समीक्षा अध्यापन आणि प्रशासन क्षेत्रांतील दीर्घ अनुभव असणाऱ्या संपादकांनी अनेक व्यक्ती संस्था व हितचिंतक यांच्या सहकार्याने सिद्ध केलेला हा संदर्भग्रंथ मराठीचे अध्ययन अध्यापन व संशोधन करणाऱ्या सर्वांना तसेच जिज्ञासू वाचक चोखंदळ साहित्यप्रेमी ग्रंथसंग्राहक व ग्रंथालये यांना उपयुक्त ठरावा."