Sankshipta Marathi Vangamaykosh Part 2 | संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड २

Sankshipta Marathi Vangamaykosh Part 2 | संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड २
आरंभापासून आजतागायतच्या मराठी वाङ्मयाची ओळख सर्वसामान्य मराठी वाचकांना व्हावी या हेतूने या कोशाची योजना आखली आहे. १. आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड २. १९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड २ (१९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड) "१९२० ते २००३ अखेरपर्यंतच्या कालखंडातील ग्रंथ ग्रंथकार प्रकाशक नियतकालिके वाङ्मयीन चळवळी यांविषयीच्या नोंदी असलेला संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशाचा हा खंड म्हणजे मराठी वाङ्मयजगताचे सम्यक चित्र प्रस्तुत करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे." "या कालखंडाच्या आरंभातच गांधी सावरकर आंबेडकर अशा उत्तुंग विभूतींच्या विचारांचा आणि कार्याचा आरंभ आहे. गांदीवाद मार्क्सवाद अशा तात्विक सरणींचा राजकीय-सामाजिक चळवळींचा जन-आंदोलनांचा हा कालखंड आहे. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यांच्या मधल्या काळातले मराठी साहित्य दुसऱ्या महायुद्धानंतरचे मराठी साहित्य आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे मराठी साहित्य हे या ग्रंथातील नोंदींचा विषय झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विविध वाङ्मयीन चळवळींचा परामर्श या नोंदीमध्ये घेतला आहे.." "ह्या खंडातही नोंदीसोबत लेखकांची छायाचित्रे ग्रंथांची आणि नियतकालिकांची मुखपृष्ठे रेखाचित्रे दिली आहेत. साहित्य पुरस्कार साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि संदर्भग्रंथांची सविस्तर सूची अशी परिशिष्टे या ग्रंथाला जोडली आहेत." "मराठी साहित्याच्या आरंभापासून आजतागायतच्या मराठी साहित्याविषयी नोंदी असलेल्या 'संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा' च्या दोन खंडांत समग्र मराठी साहित्याचे संक्षिप्त पण स्पष्ट आणि रेखीव चित्र साकार झाले आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांप्रमाणेच सर्वसामान्य वाचकांनादेखील हा ग्रंथ संग्राह्य वाटावा असा झाला आहे."