Sanman Haus |सन्मान हौस

Sanman Haus |सन्मान हौस
'मॅडनेस'ला सर्वांगाने भिडणारे 'सन्मान हौस'.. कोणतेही एकच सूत्र घेऊन वाचता येऊ नये असे व्यामिश्र लेखन ही ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांची खासियत आहे. 'सन्मान हौस' या त्यांच्या नाटकातही ती प्रकटली आहे. टोकाचे सूडनाट्य असे या नाटकाचे सूत्र आहे. मेलेल्या सासूचा एका सुनेला सूड उगवायचा आहे. जिवंतपणी या सासूने सुनेला अपमानास्पद वागवले आहे. 'सन्मान हौस' ही सन्मान पुरविणारी एजन्सी आहे. माणसाची सन्मानाची हौस, आधुनिक जगातला भारतीय मध्यमवर्गीय माणूस, नातेसंबंध, संस्कृती, मानवी मनाची जडणघडण, समाजव्यवस्थेने व्यक्तीचा न केलेला विचार, व्यक्तीने समाजाचा न केलेला विचार, पिढ्यांमधील विसंवाद, सामाजिक सूडाची भावना, दहशतीची वृत्ती या सार्यातला 'मॅडनेस' प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारा आहे. 'सन्मान हौस' मधील या मॅंडनेसला भिडणे हा वाचकांसाठी आणि रंगकर्मींसाठीही वेगळा अनुभव ठरू शकतो.