Sanskruti - Sambhram | संस्कृति - संभ्रम

Sanskruti - Sambhram | संस्कृति - संभ्रम
सध्याच्या आधुनिक काळात संपूर्ण मानवसमाज आणि संस्कृति अभूतपर्व अशा स्थित्यंतरातून व संक्रमणातून जात आहे. नव्या सुधारणांमुळे काही नव्या समस्याही सांस्कृतिक जीवनात निर्माण झाल्या आहेत व मोठे दोषही वाढीस लागले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, बहुजनसमाजाची मनोवृत्ती व वर्तणूक, स्त्री-पुरुष समानता, स्त्री-मुक्ती, कुटुंबसंस्था, औद्योगीकरण, शहरीकरण, व्यापक स्वरूपातील आर्थिक व राजकीय नियंत्रणे, यंत्रवाद व केंद्रीकरण यांवर अरलंबून राहण्याने माणसाचे जीवन फारच परावलंबी, पराधीन बनत आहे. या सर्वांची प्रस्तुत ग्रंथात लेखक डॉ. ग. ना. जोशी यांनी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्म, शिक्षण यांच्या विविध दृष्टीतून चिकित्सक मीमांसा केलेली आहे, म्हणून या ग्रंथाचे स्वरूप आंतरशास्त्रीय झाले असून ते संस्कृतीचा समग्रतेने विचार करण्यास फारच उपयुक्त व काही प्रामाणात प्रेरक व मार्गदर्शक ठरावे अशी अपेक्षा आहे. या दृष्टीने हा ग्रंथ आगळावेगळा व सध्याच्या काळात वैशिष्ट्यपूर्ण व कालोचित ठरू शकेल असाही विश्वास वाटतो.