Santaji | संताजी

Santaji | संताजी
छ्त्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठयांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, आता मराठे संपले ! आणि... अचानक एक भयंकर वादळ घोंगावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल साम्राज्याच्या अवाढव्य जहाजाची शिडे फाडली, डोलकाठ्या मोडल्या. त्याच्या पताका आणि छत्रचामरे चिरफाळून पराजयाच्या पर्वतपाय लाटांवर नाचवत पुन्हा त्याने त्याला सागराच्या मध्यभागी नेऊन सोडले. त्यानंतर कधीही या जहाजाला यशाचा किनारा दिसला नाही. अखेर ते बुडाले. दख्खनच्या धरतीवर उसळलेल्या त्या वादळाचे नाव होते - संताजी घोरपडे ! राष्ट्राच्या आपत्काली उभ्या देहाची तलवार करून मराठ्यांचा हा महान सेनापती शत्रूवर कडोविकडीने कोसळला. हि कहाणी त्या रणमर्दाच्या बेजरब झुंजीची, त्याच्या पराक्रमाची आणि अप्रतिम रणकौशल्याची आहे ! पाशवी परचक्राच्या कठीण कालखंडात तमाम महाराष्ट्र एका बलाढ्य साम्राज्याशी कसा लढला, कसा जिंकला नि कसा जगाला याचा ज्वलंत इतिहास सांगणारा ऐतिहासिक दस्ताऐवज आहे !