Sarfarosh | सरफरोश

Sarfarosh | सरफरोश
१८५७ सालच्या स्वातंत्र्यसंग्रामापासून १९७१ च्या युध्दापर्यंत देशासाठी प्राणार्पण करणार्या सर्व सर्वधर्मीय शूरवीरांची आठवण सर्वांना खास करून नवीन पिढीला करून देणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात छोट्या छोट्या गटांनीही काही क्रांतिकारी कृत्ये केली. त्यांपैकी एक म्हणजे, काकोरी स्टेशनजवळ ट्रेनवर दरोडा घालून सरकारी खजिन्याची केलेली लुट. ह्या कटात सामील झाले होते, पं रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खॉं, चंद्रशेखर आजाद ह्यांच्यासारखे तरूण. ह्यांपैकी चंद्रशेखर आझाद यांची माहिती बर्याच जणांना आहे, तेवढी पं. रामप्रसाद बिस्मिल व अस्फाकउल्ला खॉं यांची मात्र नाही.