Sarkari Davakhana | सरकारी दवाखाना
Sarkari Davakhana | सरकारी दवाखाना
डॉ. कोयाडे यांचे सरकारी दवाखाना हे पुस्तक म्हणजे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे जिवंत चित्रण आहे. एका डॉक्टरच्या नजरेतून समाजातील वेदना, संघर्ष, अडचणी आणि त्यातील मानवी मूल्यांचे दर्शन घडते. सरकारी दवाखान्यातील रुग्णांची गर्दी, मर्यादित साधनं, पण तरीही जिव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सर्व लेखणीतून अत्यंत प्रामाणिकपणे उमटले आहे. या पुस्तकात केवळ आरोग्यसेवेची कथा नाही, तर माणुसकीचा ठेवा जपणाऱ्या डॉक्टरची खरी कहाणी आहे. वाचताना मनात आदर निर्माण होतो आणि आरोग्यसेवेतील खऱ्या नायकांची जाणीव होते. सरकारी दवाखान्याची व्यवस्था आहे म्हणून बाकी सर्व व्यवस्था टिकून आहेत.
सरकारी दवाखाने नसती तर गरीब लोक तडफडून मेली असती. अशीच ही आपल्या आजूबाजूच्या सामान्य लोकांची ही कहाणी आहे.