Sarswatancha Sankshipta Itihas | सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास

Sarswatancha Sankshipta Itihas | सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास
पोर्तुगीज हे रानटी आणि अधमवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील स्त्रियांवरही अत्याचार केले, याचे पुरावे उपलब्ध आहेत. सारस्वतांतील पूर्वजांनी ४५० वर्षांच्या अमानुष धार्मिक छळानंतरही आपला धर्म, संस्कृती व भाषा जतन केली, त्यांची वृद्धी केली. स्थलांतर करून इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या सारस्वत कुटुंबांनीही त्या त्या प्रांतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आजही जगात, अमेरिकेत स्थलांतरित होऊन नाव आणि पैसे कमविण्यात ते बिनीच्या जागेवर आहेत. सारस्वतांची ऐतिहासिक पार्श्वभूमी व त्यांचे पूर्वी व आताच्या काळातील योगदान याचा लेखाजोखा प्रस्तुत पुस्तकात संक्षिप्तपणे देण्यात आला आहे.