Sarth | सार्थ

S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Regular price Rs. 356.00
Sale price Rs. 356.00 Regular price Rs. 395.00
Unit price
Sarth ( सार्थ ) by S. L. Bhyrappa ( एस. एल. भैरप्पा )

Sarth | सार्थ

About The Book
Book Details
Book Reviews

आठव्या - नवव्या शतकात घडणारी कथा सार्थ. सार्थ म्हणजे व्यापारी तांडा. कथेची सुरुवात होते ब्राह्मण नागभट्ट आणि राजा अमरुक यांच्यात असणा-या मैत्रीने. राजा अमरुक हा स्त्रीलंपट आहे. नागभट्टाचा हा बालपणीचा मित्र आहे. नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करता यावे म्हणून तो नागभट्टाला हेरगिरीच्या निमित्ताने सार्थांबरोबर राज्याबाहेर पाठवतो. वर्ष-दीड वर्ष सरल्यावर नागभट्टाला बातमी मिळते की, आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने आपल्या विश्वासघात केला आहे. पुन्हा घराकडे न फिरकणे, हेच त्याला योग्य वाटते. भाषेवर प्रभुत्व असणारा नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. कृष्णानंद नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याची नाटकातली सहकलाकार असणारी नटी चंद्रिका हिच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी चंद्रिका शरीर पातळीवरील प्रेम मानत नसते. नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्ग धरतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची भेट होते. बौद्ध धर्माचा उदय, त्याला वैदिक धर्माचा विरोध, मुघलांची आक्रमणे यांच्या पार्श्वभूमीवर ही सार्थची कथा घडते.

ISBN: 978-9-38-634216-4
Author Name: S. L. Bhyrappa | एस. एल. भैरप्पा
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Uma V. Kulkarni ( उमा वि. कुलकर्णी )
Binding: Paperback
Pages: 272
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products