Saturday Night Fever | सॅटर्डे नाईट फिव्हर

Saturday Night Fever | सॅटर्डे नाईट फिव्हर
मराठी कथा साहित्याचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की महानगरी संवेदना लिहिणारे कथाकार तुलनेत कमी आहेत. याचे एक कारण असे की महानगरी संवेदना कथेत आणताना मुळातच रुक्ष असलेले कथाविषय, कथाप्रदेश आणि कथापात्रे कथेत त्यांची त्यांची रुक्ष आणि असंवेदनशील वृत्ती घेऊन येतात त्यामुळे कथा अधिकच कोरडी होण्याची, वाटण्याची शक्यता दाटते. महानगरी जगणेच मुळात विस्कळीत आहे. तो अव्याहत विस्कळीतपणा, निर्दयी वेग, स्थलकालाचे जीर्ण तुकडे, आणि माणसाचे रोज दररोज नव्याने तुकड्यातुकड्यात होणारे खच्चीकरण अवमूल्यनाने कथेचा आवेग आणि परिप्रेक्ष्य इतका वाढतो की आकलनस्तरावर महानगरी कथा विस्कळीत वाटण्याचा धोका संभवतो. हे सर्व संभाव्य धोके टाळून उदय कुलकर्णी यांची प्रत्येक कथा समकालातील जगण्याचे पेच मांडत वाचकांच्या मनावर पकड घेते.