Saubhagyalena..Parvatibai Peshwe | सौभाग्यलेणं..पार्वतीबाई पेशवे

Saubhagyalena..Parvatibai Peshwe | सौभाग्यलेणं..पार्वतीबाई पेशवे
पानिपतच्या रणधुमाळीत पेशवाईतील अनेक व्यक्ती लखलखून उठल्या, विश्वासराव, भाऊसाहेब, जनकोजी शिंदे, इब्राहिमखान गारदी आणि समशेरबहाद्दर. "पार्वतीबाई या पानिपतच्या साक्षीदार आहेत. पार्वतीबाई या पेशविणबाईंची ही हकीगत आहे. अत्यंत अबोल साधे व्यक्तिमत्व पण जीवनात दुःख यातना सोसलेल्या स्त्रीची ही कहाणी. तारुण्यात पानिपतचा नरसंहार पाहत पतीच्या परतीची वाट पाहणारी 'स्वामी येणार' या शब्दांच्या वलयाने आयुष्यभर सौभाग्यलेणे लेवून रहाते. अनेकदा अपमानही सहन करते धर्मशास्त्र कर्मकांड रूढी व परंपरा यांच्या भिंती पार करून जगते. " "शनिवारवाड्यात पदार्पण केले तेव्हा वाडा आप्तांनी भरलेला होता. नारायणरावांच्या खुनानंतर एकटी राहते. अबोलपणे सर्व घटना पाहत एकटेपण सोसत पतीची प्रतीक्षा करत राहिली. तिच्या सोशिकपणाची व्याकुळतेची ही कहाणी मनास चटका लावते. पार्वतीबाई पेशवे यांची ही कहाणी."