Savitribai Phule : Jivan Ani Varasa | सावित्रीबाई फुले : जीवन आणि वारसा

Savitribai Phule : Jivan Ani Varasa | सावित्रीबाई फुले : जीवन आणि वारसा
सावित्रीबाई फुले यांचा जन्म जवळजवळ २०० वर्षापूर्वी झाला. त्या वेळचा भारत, त्यातलं सामाजिक वातावरण 'आज'च्या भारतापेक्षा खूप वेगळं होतं. 'माणूस' म्हणून जन्माला आल्यावर मिळणारे अधिकार हे त्या काळी केवळ तो कुठे आणि कोणाच्या पोटी जन्माला येतो, बावर अवलंबून होते. खी आणि पुरुष यांना वेगळे नियम, ब्राम्हण आणि शुद्र यांना वेगळे नियम अशी परिस्थिती होती. समाजाने आखून दिलेल्या मर्यादा नील सर्वात तेंव्हा त्या ओलांडण्याची परवानगी ना स्त्रियांना होती ना शुद्रांना. मात्र मर्यादांची ती चौकट मोडण्याचे धारिष्ट्य सावित्रीबाईना फुले यांनी दाखवले. सामाजिक असमानतेच्या या लढाईत सावित्रीबाईंना त्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या जोतिराव फुले यांची साथ लाभली. समाजात अन्याय, अत्याचार करणाऱ्या ज्या शक्ती होत्या, त्यांच्याविरोधात त्या लढल्या. त्यांची ही लढाई फक्त त्रीशिक्षणासाठीच नव्हती; तर त्याबरोबरच विधवांना जाचक परिस्थितीतून मुक्त करण्यासाठीही होती अस्पृश्य आणि मागास वर्गातील लोकांना शिक्षित करण्यासाठीही त्या लढल्या.