Say - Maza Kalapravas |सय - माझा कलाप्रवास
Say - Maza Kalapravas |सय - माझा कलाप्रवास
सई - रँग्लर परंजपेंची नात, शकुंतला परंजपेंची मुलगी. सध्या वय ८२/८३ ची ही तरुणी. सई परंजपेचे हे आत्मकथन सय. तिच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा घेणारे हे पुस्तक एखाद्या कादंबरी इतकेच वाचकाची पकड घेणारे झाले आहे. आजोबांची कडक शिस्त. आईने ही शिस्तीचा कित्ता पुढे गिरवलेला. प्रसंगी आईच्या हातचा मार खावा लागलेला. रेडिओवरची ध्यानीमनी नसताना मिळालेली नोकरी. दूरदर्शन मध्ये केलेले काम. एन. सी. पी. ए. मधील खडतर शिक्षण. स्वत: निर्मिलेली नाटके, सिनेमा आणि त्या प्रत्येक वेळी करावा लागलेला संघर्ष ह्याचे स्वत: सईनी चितारलेले हे चित्र प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.