Sepiya | सेपिया

Sepiya | सेपिया
काही माणसं जन्माला येतात तीच एखादं दैवी लेणं घेऊन मग ती शब्दभाषा असो, चित्रभाषा असो अथवा छायाचित्रभाषा. आणि या तिन्ही कला एकत्रितपणे एखाद्याच्या ठिकाणी नांदत असतील, तर तो, अनोखा संगमच म्हणावा लागेल, असाच एक विधात्यानं भरभरून दिलेला भाषाप्रभू लेखक, तीन अग्रेसर मासिकांचा संपादक आणि सर्जनशील कलावंत म्हणजे आनंद अंतरकर. 'सेपिया' हा - अंतरकरांचा दुसरा व्यक्तिचित्रसंग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे. सेपिया' हे नावही अंतकरांच्या सर्जक आणि कलागम्य प्रतिभेचं द्योतक आहे. व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळेच अंतरकर रेखीव नि घोटीव शैलीतून आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात आणि मग त्या व्यक्तींवर आपोआपच कालगतीचा ठेवणीतला सेपिया' चढत राहतो.