Sexayan | सेक्सायन

Sexayan | सेक्सायन
सेक्सबद्दल जेवढे गैरसमज जनमानसात आढळतात, तेवढे दुसर्या कोणत्याही विषयाबद्दल आढळत नाहीत. हे गैरसमज कसे निर्माण झाले? सेक्सबद्दलच्या विविध समजुती वेगवेगळ्या मानवी समाजांत कुठून आल्या? सेक्ससंबंधीचे आधुनिक संशोधन चालते तरी कसे? अशा विविध बाबींचा ऊहापोह 'सेक्सायन'मध्ये करण्यात आला आहे.सेक्सबद्दल वैद्यकीय माहिती देणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; पण सेक्सबद्दल मानवशास्त्रीय माहिती देणारे एकही पुस्तक मराठीत नाही. सेक्सबद्दलच्या आधुनिक संशोधनातून मानवी वर्तणुकीचं स्पष्टीकरण द्यायचा जो प्रयत्न चालू आहे, त्यासंबंधीची माहितीही 'सेक्सायन' मध्ये आहे. "सेक्सायन वाचताना ज्ञान तर मिळेलच; पण करमणूकही होईल. दोन-चार मित्रांनी मिळून गप्पा माराव्या तशा शैलीत लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं."