Shahid | शहीद
Shahid | शहीद
केवळ तेवीस वर्षं वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण 'माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही' ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढंच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधन करून ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणार्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा - शहीद!