Shakespeare Aani Cinema |शेक्सपिअर आणि सिनेमा

Shakespeare Aani Cinema |शेक्सपिअर आणि सिनेमा
शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार समजला जातो. सामान्य वाचकांपासून ते अभिजात कलावंतांपर्यंत, लेखकांपर्यंत, तत्त्वचिंतकांपर्यंत असंख्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याच्या नाटकांची मोहिनी जगभरातील महान चित्रपट दिग्दर्शकांवर देखील पडलेली असून त्याच्या नाटकांवर आजवर चारशे पेक्षा अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. शेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयशाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणार्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा हा ग्रंथ विजय पाडळकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे.