Sharir Vidnyanache Tushar | शरीर विज्ञानाचे तुषार

Sharir Vidnyanache Tushar | शरीर विज्ञानाचे तुषार
आपण कधीच आजारी पडू नये अशीच आपली इच्छा असते. एवढंच नाही तर आपण सुदृढ, तल्लख, चपळ , आनंदी असावे, बऱ्याच गोष्टी सहज करता याव्यात असंही मनापासून वाटत असतं. ठणठणीत प्रकृती असणारेही कधी ना कधी आजारी पडतात किंवा अस्वास्थ्याची काही लक्षणं त्यांच्यात दिसू लागतात.आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. अत्यंत क्लिष्ट असलेल्या शरीर- विज्ञानाबाबत आपल्या निरामय प्रकृतीसाठी जाणून घेणं हिताचं. अगदी थोड्या वेळात वाचून होईल असं हे सहजसोपं लेखन एकदा वाचल्यावर वारंवार वाचावंसं वाटेल.